काचबिंदू म्हणजे काय? (Glaucoma Week Special)

जागतिक काचबिंदू सप्ताह विशेष

पूर्वनिदान आणि योग्य औषधोपचारांति काचबिंदूपासून दृष्टीचे रक्षण शक्य

डोळ्याच्या नेत्रगोलातील दाब वाढल्याने डोळ्याच्या ऑप्टिक नर्व्ह म्हणजे डोळ्यापासून मेंदूला जोडणार्‍या मुख्य मज्जातंतूला हानी पोहचते. त्यामुळे व्यक्तीची दृष्टी हळू-हळू अधू होऊ लागते. डोळ्यांच्या अशा परिस्थितीला काचबिंदू म्हणतात. जर काचबिंदूचे वेळेत निदान झाले नाही तर कायमचे अंधत्व देखील येऊ शकते.
मुख्यतः चाळीशी पार केलेले व्यक्तींना याचा धोका संभवतो. वेळेत निदान न झाल्यास उपचाराअभावी दृष्टी गमावण्याची वेळ येऊ शकते. मात्र, अशा विकाराचे पूर्वनिदान झाले; वेळेत व नियमित औषधोपचार केले तर दृष्टीचे रक्षण करता येते. आणि यासंदर्भातच जनजागृती करण्यासाठी दरवर्षी जागतिक काचबिंदू संघटनेतर्फे जागतिक काचबिंदू सप्ताह साजरा करण्यात येतो. यावर्षी हा सप्ताह 8 ते 14 मार्च दरम्यान साजरा करण्यात येत आहे.
काचबिंदूला बोलीभाषेत ‘कालामोती’ असेही संबोधतात. काचबिंदूची लक्षणे लवकर आढळून येत नाहीत. मात्र, जेव्हा ती आढळून येतात तेव्हा वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे यास ‘सायलंट थीफ ऑफ व्हिजन’ म्हणजे आपल्या दृष्टीचा मुक चोर असेही म्हणतात.
याचे निदान करण्यासाठी आयओपी म्हणजे ‘इंट्राऑक्युलर प्रेशर’ तपासणे आवश्यक आहे. हे 10 ते 21 एमएमएचजीच्या दरम्यान असते आणि वेळेनुसार बदलत जाते. जर या बदलातील फरक 4 हून अधिक असेल तर काचबिंदू होण्याची शक्यता असते. याशिवाय विविध तपासण्या देखील करण्यात येतात. त्यामध्ये ओसीटी, फिल्ड टेस्टिंग, ऑपॅथलमोस्कोपी टेस्ट, फंडस फोटोग्राफी आदी चाचण्या करण्याचा सल्ला नेत्ररोगतज्ज्ञ देत असतात.ucomaweekspecial.html
काचबिंदू विकाराचे निदान झाले की ‘फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट’ म्हणून सर्वप्रथम औषधोपचार सुरू करतात. डोळ्यात विशिष्ट प्रकारचे ड्रॉप घालून डोळ्यातील ताण कमी केल्या जातो. शिवाय ड्रॉप देऊन प्रेशर कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. शिवाय औषधोपचार नियमित करावे लागतात आणि लक्षणानुसार औषधोपचारांमध्ये बदल देखील केल्या जाते. शेवटचा उपचार म्हणून शस्त्रक्रिया करण्याचा सल्लाही डॉक्टर्स देतात. मात्र, काचबिंदूमुळे गेलेल्या दृष्टीला परत मिळविता येत नाही. जेवढी दृष्टी शिल्लक असते, तेवढ्याची रक्षा करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा पूर्णपणे अंधत्व देखील येऊ शकतते.
लक्षणे
  • धुसर दिसणे
  • प्रकाशाभोवती इंद्रधनुष्यासारखे वलय दिसणे
  • डोकं आणि डोळे दुखणे व उलटी होणे
  • वरील लक्षणे वारंवार आढळून येणे
  • हळूहळू दृष्टी कमजोर होणे
यांना धोका संभवतो
  • घरात कुणाला काचबिंदू असेल तर
  • स्टिरॉईड ड्रॉप्स वा संप्रेरकाचे सेवन केले तर
  • मोठा मायनस नंबर म्हणजे मायोपिया असेल तर
  • मधूमेह व उच्चरक्तदाबग्रस्त व्यक्ती
  • डोळ्यांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर
  • मोतिबिंदूकडे दुर्लक्षित केल्यास
  • सुडोएक्सफोलेशन सिन्ड्रॉम असेल तर
  • पिगमेंट डिस्परशन सिन्ड्रॉम असेल तर
best Ophthalmologist Surgeon in Nagpur - Dr. Nita D. Rathi
नियमित तपासणी करावी : डॉ. नीता राठी
घरात कुणाला काचबिंदू असेल, मधूमेह-उच्चरक्तदाबादी विकार असतील अथवा चाळीशीनंतर काचबिंदूचा धोका जास्त असतो. अशा वेळी डोळ्यांची नियमित तपासणी करावी. वर्षातून एकदा केलेल्या चाचणीतून काचबिंदूची लक्षणे आढळून आली, तर त्यावर नियंत्रण मिळविता येते आणि दृष्टीची रक्षण करता येते, असे मत नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. नीता राठी यांनी व्यक्त केले. (Glaucoma Week Special Story initiative by RNH Hospital, Nagpur)

Similar Posts

  • लहान मुलांमध्ये चष्म्याचे वाढते प्रमाण

    लहान मुलांमध्ये चष्म्याचे वाढते प्रमाण हल्ली लहान वयातच चष्मा लागतोय्. शाळेत डोळ्यांची तपासणी झाली की कळते की, चष्म्याचा नंबर निघालाय की नाही…! मात्र, त्यापूर्वी देखील चष्म्याचा नंबर असण्याची शक्यता असते. बाळाच्या जन्मानंतर सहा महिन्यात डोळे बर्‍यापैकी विकसित झालेले असतात. या दरम्यान डोळ्यांचा योग्य विकास झाला नाही तर चष्म्याचा नंबर लागण्याची शक्यता असते. लहान बाळांचे डोळे…

  • मधूमेह आणि डोळा

    मधूमेह आणि डोळा अलिकडल्या काळात जीवनशैलीचे विकार वाढत आहेत. त्यामध्ये मधूमेहाचे प्रमाण लक्षणीय आहे. मात्र, आजही समाजात मधूमेह आणि डोळ्यांच्या विकारांच्या संबंधांबद्दल फारशी जागृती नाही. खरं सांगायचं तर मधूमेह या रोगाचा डोळ्यांवर दुरगामी परिणाम होतो. मधूमेहाने ग्रसित असलेल्या रुग्णांना डोळ्यांचे विकार होण्याची संभावना सामान्य व्यक्तींपेक्षा जास्त असते. मधूमेहामुळे डायबिटिक रेटिनोपैथी, मेक्युलोपैथी, कमी वयात मोतिबिंदू अथवा…

  • चष्म्याचा नंबर घालवण्यासाठी लेजर सर्जरी किती उपयुक्त…!

    चष्म्याचा नंबर घालवण्यासाठी लेजर सर्जरी किती उपयुक्त…! चष्म्याचा नंबर घालविण्यासाठी लेजर सर्जरीचा मार्ग आपणास ठावूक असेलच. त्यामुळे चष्म्यांपासून मुक्ती मिळते, असेही ऐकिवात असेल. त्या अनुषंगाने डोळ्यांचा नंबर घालविण्यासाठी लेजर सर्जरी किती उपयुक्त आहे, याचा उहापोह प्रस्तुत लेखात करणार आहे.डोळ्याच्या पुढील पारदर्शक भागास ‘कॉर्निया’ म्हणजे ‘डोळ्यांच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा’ म्हणतात. हा आकाराने अंतर्गोल (कॉन्व्हेक्स) असतो. याद्वारे…

  • मोतिबिंदू (Cataract)

    मोतिबिंदू मोतिबिंदू डोळ्यांचा सामान्यपणे आढळणारा विकार आहे. परिवारात आपल्याला मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करवून घेणारे काका-मामा-आज्जी नक्कीच भेटले असतील. शिवाय मोतीबिंदूची शस्त्रक्रिया लेजरद्वारे केली असेही अनेकांकडून ऐकले असेल. आज आपण मोतिबिंदू म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया..आपल्या डोळ्यात प्रतिमा निर्मिती होण्यापूर्वी प्रकाशकिरणे तीन स्तरातून जातात. पहिला म्हणजे कॉर्निया; ज्यास आपण डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडता म्हणतो. त्यानंतर दुसरा…

  • डोळ्यांची नियमित काळजी (Regular Eye Care)

    ये काली काली आंखे… हे गाणे सर्वांनी एकले आहे. मात्र, याच डोळ्यांची काळजी घेण्याची जेव्हा वेळ येते; तेव्हा आपण सपेशल दुर्लक्ष करतो. डोळे हा फार नाजूक अवयव आहे. वाढत्या वयात तर ते अधिक संवेदनशील असतात. त्यामुळे लहानग्यांचा आहार चांगला असावा. ‘व्हिटॅमिन ए’ युक्त आहार म्हणजे हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा गर, पपई, संत्रे इ.चे नियमित सेवन…